Maharashtra Political News: राज्यातील महायुती सरकारची गुरूवारी रात्री एक महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला महायुती सरकारमधील मंत्र्यांची उपस्थिती होती. दरम्यान, या बैठकीत तीन महत्वाचे ठराव पारित करण्यात आलेत. (Latest Marathi News)
यातील दोन ठराव हे अभिनंदनाचे, तर एक ठराव संकल्पाचा असल्याची माहिती आहे. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार (Narendra Modi) आणायचं आहे, असा देखील ठराव या बैठकीत पारित करण्यात आला आहे.
बैठकीत भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल इस्त्रोचे सर्व शास्त्रज्ञ आणि भारताचे सर्व नागरिक तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक, सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प पुन्हा वेगाने सुरु झाले म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 2019 पेक्षा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून 45 पेक्षा अधिक खासदार निवडून देण्याचे आमचे प्रयत्न आहे, यासाठी आम्ही तयारी सुरू केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. इंडिया आघाडीची मुंबईत झालेली आजची बैठक म्हणजे फुसका बार, अशी टीकाही त्यांनी केली.
दुसरीकडे, इंडिया आघाडीने कितीही बैठका घेतल्या तरी त्यांना यश येणार नाही, मोदी यांनी केलेली काम आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेमध्ये सर्वाधिक बहुमत मिळवून देण्याचा निर्धार आम्ही आजच्या बैठकीत केला असून उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत, असं शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी सांगितलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.