Chandrayaan-3 News: अरे बापरे! चंद्रावर आला भूकंप? संशोधन करताना प्रज्ञान रोव्हरही हादरला

Chandrayaan-3 Latest Updates: इस्त्रोला चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर होत असलेल्या नैसर्गिक हालचालींची नोंद केली आहे.
Mission chandrayaan 3 Latest Update vikram Lander detected natural earthquake like movements in Moon
Mission chandrayaan 3 Latest Update vikram Lander detected natural earthquake like movements in MoonSaam TV
Published On

Chandrayaan-3 Latest News: भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी ठरली असून इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचं यशस्वी लँडिग केलं आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करत आहे. अलीकडेच, चंद्राच्या विक्रम लँडरने पृष्ठभागावरून घेतलेले अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. मात्र, यावेळी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Mission chandrayaan 3 Latest Update vikram Lander detected natural earthquake like movements in Moon
Ganapati Special Trains: कोकणवासियांसाठी गुड न्यूज, आता तिकिट होणार कन्फर्म; 'या' दोन रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे

इस्त्रोला चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर होत असलेल्या नैसर्गिक हालचालींची नोंद केली आहे. लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडद्वारे ही नोंद करण्यात आली आहे. प्रज्ञान रोव्हर आणि इतर पेलोड्सनेही यासंबंधीचा डेटा पाठवला असून आता या नोंदीचे निरीक्षण केले जात आहे.

त्यामुळे आता चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागणार आहे. या संशोधनातून क्रांतिकारी माहिती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावरुन येणारी ही माहिती खरोखरच भूकंपाची आहे की आणखी काही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

विक्रम लँडरमध्ये काही महत्त्वाची उपकरणे लावण्यात आली आहेत. यावरून चंद्राच्या गोलार्धावर होणारी कंपने रेकॉर्ड केली जात आहेत. अशा प्रकारची कंपने रेकॉर्ड करण्यास ही उपकरणे सक्षम आहेत. या उपकरणांनी गुरुवारी चंद्रावरील पृष्ठभागावर सिस्मिक अॅक्टिव्हिटीचा शोध घेतला आहे, असं इस्रोने म्हटलं आहे.

चांद्रयान मोहिमेत लागला महत्त्वाचा शोध

दरम्यान, भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. तसंच सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचं आढळल आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com