पुण्यातून स्टंटबाजीचा एक धक्कादायक व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ काही तरुण रिल्ससाठी आपला जीव धोक्यात घालून व्हिडीओ शूट करत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. पुण्यातून व्हायरल झालेल्या या स्टंटबाजीच्या व्हिडीओवर रीलस्टार अथर्व सुदामने (Reel Star Atharva Sudame) प्रतिक्रिया दिली आहे. 'व्ह्यूज-लाईक्स वाढावण्यासाठी काहीही करू नका. आपला जीव धोक्यात घालू नका.', असा मोलाचा सल्ला अथर्व सुदामेने दिला आहे.
साम टीव्हीशी बोलताना अथर्व सुदामेने तरुणांना आवाहन केले आहे की, 'सल्ला नाही देणार पण मित्र म्हणून सांगतो की असं करू नका. लोकं टाईम पास म्हणून घेतील. जीव घेणं करण्यापेक्षा जीव वाचवण्यासठी काही तरी केलं तर लोकं तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीत का? व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी हे सर्व केलं जातं. असे व्हिडीओ केलं तर टीका होते. चांगलं केलं तर लोक बघतील त्यामुळे चांगलं करा.'
'अनेक गोष्टी समाजात घडत आहेत त्यावर केलं तर लोकं बघत असतात. आपले व्ह्यूज आणि लाईक्स वाढावे यासाठी काही करू नका. आवडती ती कला शिका ती लोकांसमोर मांडा लोकांना ते आवडेल. कारवाई होईल असं काही केलं तर कायदेशीर कारवाई होईल. मात्र असे व्हिडीओ करणाऱ्या मुला मुलींच्या पालकांनी आपली मुलं-मुली काय करतात याकडे लक्ष दिले पाहिजे.', असा सल्ला देखील अर्थवने मुलांच्या पालकांना दिली आहे.
त्याचसोबत, 'मानसिकता काही नाही लोकांनी बघावं हीच मानसिकता आहे. पण इन्स्टाग्रामवर फालतूपणा खूप असतो. काही जण वेड्यासारखे करत असतात. पण काहीजण चांगले पण करत असतात. जीव धोक्यात टाकून असलं काही करू नका. असं करून काहीच होणार नाही. तुमचंच नाव खराब होतं.', असे देखील अथर्वने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.