Ravindra Dhangekar Sushma Andhare Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: 'पब'विरोधात मविआ आक्रमक; सुषमा अंधारे आणि धंगेकरांनी पोलीस कार्यालयात ठाण मांडलं, हप्ते वसुलीची यादीच वाचली!

Ravindra Dhangekar Sushma Andhare Protest: महाविकास आघाडीच्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर पुण्यातील पब आणि बार प्रकरणी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलीस कार्यालयात आंदोलन केलं आहे.

Rohini Gudaghe

पुण्यामध्ये महाविद्यालयाच्या परिसरात आमली पदार्थ आढळतात, यावरून पोलीस कार्यालयात सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात पब आणि बारसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. परंतु ठरवून दिलेल्या वेळेनंतरही पब आणि बार खुले असतात, यावरून आता महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. यावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलीस कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे.

रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी बनावट नोटा हातात घेऊन या प्रकरणाचा निषेध केला आहे. पुण्यात ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणानंतर वातावरण चांगलंच तापलेलं आहे. आज पुण्यात (Pune News ) पोलीस कार्यालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन केलं आहे. याप्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसलं. पब आणि बारमध्ये अवैद्य धंदे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पब आणि बार विरोधात रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करणार आहेत. अधिकाऱ्यांसमोर यावेळी सुषमा अंधारे आणि धंगेकरांनी आहेरासारखी हप्ते वसुलीची यादीच वाचली आहे. ५० खोके लिहिलेले पोस्टर्स घेऊन त्यांनी निषेध केला आहे. परवान्याशिवाय हे पब चालतात कसे, असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे. पुण्यातील पब आणि बार प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत.

महानगरपालिकेने नियमावली जाहीर केल्यानंतर तिचं उल्लंघन होत पब चालवले जातात. तरी प्रशासन काहीच कारवाई कसं करत नाही. विद्यार्थ्यांना गांजा कसा मिळतो, महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री (Porsche Accident) चालतेच कशी? असे संतप्त सवाल यावेळी सुषमा अंधारे आणि रविंद्र धंगेकरांनी विचारले आहेत. महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे पब बेकायदेशीर होते, मग तुम्ही परवानगी दिलीच कशी असा सवाल धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT