Rasta Roko On Pune Solapur Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी महामार्गावर रास्तारोको, उरुळी कांचनमध्ये ग्रामस्थ आक्रमक; नेमकं कारण काय?

Rasta Roko On Pune Solapur Highway: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जुन्या मार्गानेच यावा अशी मागणी करत उरुळी कांचन ग्रामस्थांनी आंदोलन केले. या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुणे- सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये (Uruli Kanchan) तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी (Sant Tukaram Maharaj Palakhi) ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जुन्या मार्गानेच यावा अशी मागणी करत उरुळी कांचन ग्रामस्थांनी आंदोलन केले. या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुणे- सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) रास्तारोको आंदोलन केले. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचनमध्ये न थांबता पुढे मार्गस्थ झाला. पोलिसांनी आंदोलनकांची समजूत काढून पालखी पुढच्या दिशेने मार्गस्त केली.

संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना उरुळी कांचन येथे ती थांबली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पालखी थांबवण्याचा प्रयत्न केला. पालखीचा मार्ग बदलण्यात आल्यामुळे विश्वस्थ आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. हा वाद वाढला आणि ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर पोलिस अधिक्षकांनी मध्यस्थी करून पालखी पुढे मार्गस्थ केली.

दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी उरुळी कांचन येथे थांबते. पण यावेळी पालखी उरुळी कांचनमध्ये थांबली नाही. पालखीचा मार्ग बदलल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी पालखी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पालखी न थांबवता पुढे मार्गस्थ झाली. पालखी थांबवण्यात न आल्यामुळे ग्रामस्थांनी हे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना बाजूला हटवले.

उरुळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा ग्रामस्थांनी अडवला. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली. विश्वस्त आणि उरुळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला. घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी धाव घेत ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला.तुकोबा महाराजांची पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून यवतच्या दिशेने मुक्कामी चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

SCROLL FOR NEXT