Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Uruli Kanchan News: पुण्यातल्या हवेली तालुक्यातील उरुळी कांचन मपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात असलेले बिल्डींग मटेरियलचे दु‌कान अज्ञात दोन चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली.
Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद
Pune Crime NewsSaam Tv

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये चोरीच्या (Pune Crime News) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यातील उरुळी कांचनमधील (Uruli Kanchan) खेडेकर मळा परिसरात चोरट्यांनी दु‌कान फोडून चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस (Pune Police) आरोपींचा शोध घेत आहेत.

पुण्यातल्या हवेली तालुक्यातील उरुळी कांचन मपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात असलेले बिल्डींग मटेरियलचे दु‌कान अज्ञात दोन चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांच्या हाती काही लागले नसले तरी चोरट्यांनी दुकानातील साहित्यांचे सुमारे पाच हजारांचे नुकसान करून तोडफोड केली आहे. ही टना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद
Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यामध्ये दुकानात चोरटे प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद
Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

दरम्यान, गेल्या एक ते दीड महिन्यापासून उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवणे, उरुळी कांचन आणि इतर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. घरफोडी, दुचाकी गाड्यांची चोरी असे प्रकार उघड होत आहेत. वारंवार चोरीच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्य भीतीचे वातावरण आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद
Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com