Pune News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News : दुभाजक तोडून दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकले; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

Pune Accident News : पुणे - सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील सहजपूर येथे आज दुपारी साडेचार वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघात एका चालकाचा मृत्यू झाला आहे.

Sandeep Gawade

Pune News

पुणे - सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील सहजपूर येथे आज दुपारी साडेचार वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघात एका चालकाचा मृत्यू झाला आहे. तर एका ट्रकमधील क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रंगाच्या डब्याने भरलेला आयशर टेम्पो पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात होता, तर पांढऱ्या रंगाचा ६१० ट्रक यवतवरून उरुळी कांचन दिशेने जात होता. ६१० पांढऱ्या रंगाचा टेम्पो म्हेत्रे वस्तीवाजवळ आला असता समोरू आलेल्या आयशरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजक तोडून दोन्ही ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भयकंर होती की एका ट्रकमधील चालक जागीच ठार झाला. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर क्लीनर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Local Body Elections: निवडणुका नेमक्या कधी होणार? महायुतीच्या नेत्याने थेट तारखाच सांगितल्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरे बिग बॉसच्या घराबाहेर का गेला? नेमका कोणता आजार झाला होता, माहिती आली समोर

Crime News : धाराशीवमध्ये रक्तरंजित थरार! टपरी चालकाची दिवसाढवळ्या हत्या, धक्कादायक कारण

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल.

Kartik Aaryan : इच्छाधारी नागाच्या रुपात कार्तिक आर्यन; नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT