Pune Police Commissioner Amitesh Kumar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, आता थेट संपत्तीवर होणार कारवाई

Pune Police Commissioner Amitesh Kumar: पुण्यातील गुन्हेगारीवर चाप बसण्यासाठी पुणे पोलिसांची नवी रणनीती आखली आहे. गुन्हेगारांच्या आणि आरोपींच्या अवैधरीत्या उभारलेल्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. रोज हत्या, अत्याचार, चोरी, तोडफोडीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुण्यातील गुन्हेगारीवर चाप बसण्यासाठी पुणे पोलिसांची नवी रणनीती आखली आहे. गुन्हेगारांच्या आणि आरोपींच्या अवैधरीत्या उभारलेल्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे.

गुन्हेगारांनी अवैधरीत्या बनवलेले किंवा जबरदस्तीने एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करून बनवलेल्या घरांवर हातोडा पडणार आहे. अवैधरित्या कमावलेल्या पैशातून उभारलेल्या संपत्तीवर पुणे पोलिसांचे लक्ष राहणार आहे. अनधिकृत घरांवर पुणे महानगरपालिकेच्या मदतीने बुलडोझर चालवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही गुन्हेगाराने पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातूनच त्यांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. वनराज यांची हत्या करणारे आणि सुपारी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुणेच आहेच. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, जयंत कोमकर यांनी प्लॅन आखला होता. सोमनाथ गायकवाडने अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती. रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखला गेला आणि रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT