Sachin Dodke , NCP, Pune saam tv
मुंबई/पुणे

Pune NCP : भाजप कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी, खासदार सुप्रिया सुळेंच्या निकवर्तीयावर गुन्हा दाखल

वारजे पोलिस ठाण्यात भाजपच्या एका कार्यकर्त्यांने फिर्याद दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन जाधव

Pune : पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके (NCP Former Corporator Sachin Dodke) यांच्या विरोधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोडके यांच्यासह ५-६ कार्यकर्त्यांवर मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात. २०१९ ला खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवली होती. गेली अनेक वर्ष दोडेक पुणे शहरातील वारजे भागात नगरसेवक आहेत.

भाजपच्या एका कार्यकर्त्यांने वारजे पोलिस ठाण्यात (warje police station) एक तक्रार नाेंदवली. यामध्ये मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता वारजे भागात असलेल्या आर एम डी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे.

त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके,संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले.

त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याची तक्रार संबंधित भाजप कार्यकर्तांनी केली. या फिर्यादीनूसार दाेडकेंसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT