Punery Banner Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: 'येथे कचरा टाकणारा गाढव अन्...', पुणेरी बॅनरची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी संतप्त

Puneri Banner: रस्त्यावर इकडे तिकडे कचरा टाकून नागरिकांनी घाण करू नये यासाठी पुण्यात एक पुणेरीशैलीत बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरर कमेंट्स करत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

Priya More

Summary -

  • पुण्यात कचऱ्यासंदर्भात लावण्यात आलेला एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • पुणेरी शैलीतील बॅनरची सोशल मीडियावर चर्चा होत आहे

  • उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला

  • 'येथे कचरा टाकणारा मी गाढव आहे. सदर बॅनर फाडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.' असे या बॅनरवर लिहिण्यात आले

उघड्यावर कचरा टाकू नका त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते असे वारंवार सांगून देखील आणि पालिका प्रशासनाकडून यासाठी कडक पाऊले उचलण्यात येऊन देखील काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि रस्त्यावर कचरा टाकतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. हा बॅनर फक्त पुणेकरांचेच नाही तर पुण्यातून प्रवास करणाऱ्या बाहेरील शहरातील नागरिकांचे देखील लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. पुणेकर त्यांच्या पुणेरी पाट्यांसाठी ओळखले जातात. पुणेकर त्यांच्या घरासमोर, दारावर अगदी रस्त्यावर ज्या पाट्या लावतात त्या पाट्यांवर लिहिलेले संदेश किंवा सूचना या विनोदी शैलीमध्ये लिहिलेल्या असतात. रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी पुण्यामध्ये पुणेरी शैलीत एक बॅनर रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहे. 'येथे कचरा टाकणारा मी गाढव आहे. सदर बॅनर फाडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.' असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा बॅनर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत बेशिस्त नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे.

नागरिकांनी उघड्यावर कचरा फेकू नये यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहे. रेडिटवर या बॅनरचा फोटो शेअर करण्यात आला. या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'हे बॅनर पाहून आमच्या कारमधील सर्व प्रवाशांमध्ये हशा पिकला. लोकांना कसं वागायचे हे शिकवण्यासाठी असे पोस्टर्स लावावे लागतात हे खूपच वाईट आहे. ' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'मी लोणावळ्यातही असेच बॅनर पाहिले. लोक अजूनही तिथे कचरा टाकतात. त्याठिकाणी कचऱ्याचे ढिग पाहायला मिळतात.' जिथे कचरा टाकू नये असे लिहिण्यात आले आहे तिथेच कचरा टाकला जात असल्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यामध्ये कचरा अशा ठिकाणी टाकण्यात आला होता जिथे 'स्वच्छ भारत' असे लिहिण्यात आले होते. दरम्यान, महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने कचरा विल्हेवाटीचा प्रश्न पूर्णपणे सोडवावा अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. त्याचबरोबर हवेची गुणवत्ता खालावल्याने कचरा जाळण्याचा प्रश्नही शहरातील एक प्रमुख आणि चिंतेचा विषय असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधू एकत्र, भाजपच्या रणनीतीत बदल, ठाकरेंची युती शिंदेंच्या पथ्यावर

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ४ विशेष उपनगरीय सेवा चालवणार

Friday Horoscope : तुमच्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा

शिंदे वर्षावर जाऊन फडणवीसांची मालिश करता का? संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल|VIDEO

Pastry: ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT