Pune News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: मालकीच्या वादामुळे पुण्यातील हॉटेल पुन्हा चर्चेत! बिलाबद्दल ग्राहकांना दिल्या विशेष सुचना; पोस्टरने वेधले लक्ष

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील प्रसिद्ध हॉटेलचा बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने ताबा घेतल्याची घटना समोर आली होती.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Latest News: काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलची मालकी जबरदस्तीने बळकावण्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर हे हॉटेल चांगलेच चर्चेत आले होते..या हॉटेलवर मालकी कोणाची? हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.

या प्रकरणी हॉटेल मालकाच्या मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता हॉटेलबाहेरील फ्लेक्सने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलचा बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने ताबा घेतल्याची घटना समोर आली होती. ज्यानंतर शहरात खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा हे हॉटेल चर्चेत आले असून हॉटेल बाहेर लागलेल्या पोस्टरने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

या हॉटेलच्या बाहेर खवय्यांसाठी हॉटेल बाबत जाहीर सूचना देणारे फलक लावले आहेत. त्यावर हॉटेलच्या मालकी बाबतच मजकूर लिहला आहे. तसेच हॉटेल बिल देताना पैसे कॅश स्वरूपातच स्वीकारले जातील असेही पोस्टर लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवरच बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतल्याचा आरोप केला आहे. या माध्यमातून त्याने हे हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे देखील तिने म्हटले आहे.

एवढेच नाही तर लग्नाआधी पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात आंदोलनक शेतकऱ्यांसाठी वकील सरसावले, खटले मोफत लढवणार

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

SCROLL FOR NEXT