New Born Baby Leave Alone On Road Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: क्रौर्याची परिसीमा! बाळाला रस्त्यावर फेकलं, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी

New Born Baby Leave Alone On Road: पुण्यात नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये नवजात बाळाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये यासाठी त्याच्या तोंडाला पिशवी बंधण्यात आली होती. स्थानिक नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे दिले. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात नवजात बालकाला जन्म देवून रस्त्यावर सोडून देण्यात आले. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना आहे. नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले होते. रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून नवजात बाळाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.

सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर त्यांना बाळ रस्त्याच्या कडेला सापडले. नागरिकांनी तात्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. बालकाची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिस नवजात बाळाच्या पालकांचा शोध घेतत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Puri Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मेथीची कुरकुरीत पुरी, सोपी आहे रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Municipal Elections: अकोल्यात नुसता राडा! मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना आमनेसामने, केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी

Saam TV Exit Poll : तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात पाहा महा एक्झिट पोल, EXCLUSIVE

बोगस आणि तोतया मतदारांवर थेट गुन्हा दाखल होणार! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा कडक इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT