Punes Navale Bridge Turns Death Zone Saam
मुंबई/पुणे

नवले पूल की 'डेथ झोन', कधी धावत्या ट्रकला आग, तर कधी कंटेनर-कारचा भीषण अपघात, ५ वर्षांत १६ जणांचा मृत्यू

Punes Navale Bridge Turns Death Zone: नवले पूल गेल्या काही वर्षांत घातक 'डेथ झोन' म्हणून कुप्रसिद्ध झालाय. रस्ते अभियांत्रिकीतील चुका, तपासणीतील त्रुटी आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव या कारणांमुळे अपघात घडल्याचे कारण पुढे.

Bhagyashree Kamble

सतत घडणाऱ्या अपघातांमुळे नवले पूल आता अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे की काय? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. गुरूवारी नवले पुलावर आणखी एक अपघात झाला. एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने तब्बल १७ वाहनांना धडक देत मोठे नुकसान केले. या भयानक अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

ही संपूर्ण घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांवर घडली. कंटेनरच्या धडकेमुळे नवले पुलावर मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर, १७ जण जखमी असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील ५ जण तर, कंटेनर चालक आणि क्लीनरचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक, क्लीनर आणि कंटेनर मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

नवले पूल परिसर 'डेथ झोन'

पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसर हा डेथ झोन बनला असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहे. गेल्या ५ वर्षांत हे पूल पुणे शहरातील सर्वात धोकादायक ठिकाण बनलं आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा परिसर डेथ झोन म्हणून ओळखले जात आहे. रस्ते अभियांत्रिकीतील चुका, अवजड वाहनांची ढिसाळ तपासणी आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाच वर्षांतील काही भीषण अपघात

१. ३० नोव्हेंबर २०२०: ट्रेलरचा ब्रेक निकामी

२. २० नोव्हेंबर २०२२ : ४८ वाहनांना धडक

नवले पुलाजवळ एका टँकरने अनेक वाहनांना धडक दिल्याने किमान ३० जण जखमी झाले होते. या भीषण अपघातात ४८ वाहनांचे नुकसान झाले होते.

३. १७ ऑक्टोबर २०२३ : धावत्या ट्रकला आग

४. ३ मे २०२५ : ब्रेक निकामी झाल्याने अपघात

जड वाहनाचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या या अपघाताने २०२० नंतरही स्थितीत कोणताही बदल झाला नाही. रस्त्याचा उतार आणि तपासणी यंत्रणेतील त्रुटी येथे पुन्हा उघड झाल्या.

१३ नोव्हेंबर २०२५ : कंटेनर-कार भीषण अपघात

भरधाव कंटेनरने मोटारीला पाठीमागून दिलेल्या धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने ‘सुधारित महामार्ग’ ही घोषणा कितपत फोल आहे, हे पुन्हा समोर आले.

या सर्व घटनांमध्ये एकूण १६ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. इतकी जीवितहानी झाल्यावरही महामार्ग व्यवस्थापन, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार खांडबारा रस्त्यावर बस आणि कारचा अपघात

नग्न केलं अन् काळंनिळं होईपर्यंत मारलं; हॉटेल मालकाचं मॅनेजरसोबत भयंकर कृत्य, सोलापूर हादरलं

मुंबईच्या महापौरपदावर कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले|VIDEO

Bhagar Thalipeeth: उपवासाला बनवा भगरीचे खमंग थालीपीठ; ५ मिनिटांत होतील तयार

Winter Hair Care : हिवाळ्यात कोंडा झालाय? करा हे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT