Malshej Ghat Travel News
Malshej Ghat Travel News Saam TV
मुंबई/पुणे

Malshej Ghat Travel: सावधान! माळशेज घाटातून प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच...

रोहिदास गाडगे

Malshej Ghat Travel News: तुम्ही जर कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटातून प्रवास करणार असला, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, माळशेज घाटात दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाकडून देण्यात आल्या आहेत. (Breaking Marathi News)

माळशेज घाटातील रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे कॉक्रिटिकरण सुरू करण्यात आले आहे. घाटात पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील १० किलोमीटर अंतरावर हे कॉक्रिटिकरण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

त्यामुळे येत्या १९ मे पासून दर गुरूवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घाटात दगड फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे माळशेज घाटातून (Malshej Ghat) प्रवास करत असताना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मात्र, या पर्यायाने अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी राहणार आहे.

असा असेल पर्यायी मार्ग...

कल्याणवरून येताना खुबी-करंजाळे-खिरेश्वर ते कोल्हेवाही-सागनोरी-पिंपळगाव जोगा-भोईरवाडी-कोळवाडी-ओतुर-आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी वाहतूक व्यवस्था राहणार आहे. वाहनधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.

पावसाळा सुरू होताच मन प्रसन्न करणाऱ्या माळशेज घाट परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढते. त्यामुळे घाटातून हजारो पर्यटकांची वाहने येत जात असतात. अशातच काही वेळा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. माळशेज घाट हा शिवकालीन घाट आहे.

या घाटातुन मुंबई आणि जुन्नरकडे प्रवास करत असताना पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदा पाऊसाळ्याच्या आधीच वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी डागडुजीचे काम सुरू केले असून रस्त्याचे काँक्रेटिकरण सुद्धा सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महाराष्ट्रात सत्ता महाविकास आघाडीचीच येणार: जयंत पाटील

Hardik Pandya : रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का खेळला? हार्दिक पंड्यानं संघाबाहेर बसवलं का? इन्टरेस्टिंग इनसाइड स्टोरी

Tanaji Sawant |तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांचं केलं "असं" वर्गीकरण!

Balasaheb Thorat News | 13 पैकी एखाद जागेवर महायुतीचं खात उघडणार?

Vastu Tips: स्वयंपाकघरात 'या' वस्तु ठेवल्यास होईल घरातील वातावरण नकारात्मक

SCROLL FOR NEXT