Yavatmal Accident News: अतिवेग जीवावर बेतला! एसटी बस, पिकअप वाहनाचा भयानक अपघात

Yavatmal Accident News: यवतमाळ जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये एसटी बस आणि भरधाव बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक झाली.
Yavatmal Accident News
Yavatmal Accident NewsSaam TV

संजय राठोड, साम टीव्ही

Yavatmal Accident News: यवतमाळ जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये एसटी बस आणि भरधाव बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिकअप वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (१६ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कासोळा गावानजीक पिंपळगाव सुतगिरणी परिसरातील वळणावर घडली. (Breaking Marathi News)

Yavatmal Accident News
Latur Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; आईचा जागीच मृत्यू, वेळेवर मदत न मिळाल्याने मुलानेही सोडला जीव!

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची बीड-किनवट ही बस पुसदकडून येत होती. त्याचवेळी भरधाव वेगात येणारे पिकअप वाहन माहूरकडून येत होते. या दोन वाहनांमध्ये कासोळा नजीकच्या वळणावर समोरासमोर भीषण (Accident) अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला आहे.

मृताची ओखळ अद्यापही पटली नाही. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. मात्र तो मालेगावचा रहिवासी असल्याचे समजते. त्याला पुसद (Yavatmal) उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान या अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झालेला आहे. तर बसचेही नुकसान झाले आहे. बसचा चालक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. (Latest Marathi News)

Yavatmal Accident News
Palghar Crime News: पालघर हादरलं! सख्खा दाजीने केला अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; काळिमा फासणारी घटना

पुसद-माहूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र वनविभागाच्या हद्दीत रुंदीकरणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तेथे पूर्वीप्रमाणे अरुंद रस्ता आहे. येथील वळण रस्ता अतिशय छोटा असून बाजूला झाडी असल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन जवळ आल्याशिवाय दिसत नाही. अशातच बोलेरो गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली. यामधूनच हा अपघात झाला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com