Pune Koyata Gang News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; लोहगाव परिसरात दुकानासह वाहनांची तोडफोड, धक्कादायक VIDEO

Pune Koyata Gang News : लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोयता गँगच्या गुंडांनी दुकानाची तसेच वाहनांची तोडफोड केली.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत घालण्यात सुरुवात केली आहे. लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास कोयता गँगच्या गुंडांनी दुकानाची तसेच वाहनांची तोडफोड केली. इतकंच नाही, तर हातात कोयते नाचवत या गुंडांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना देखील धमकावलं. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून दहशत माजविणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या गुंडांना पकडून त्यांची भररस्त्यात धिंड काढली होती. अनेकांना तडीपाराच्या नोटीसाही धाडल्या होत्या.

मात्र, पुन्हा हळुहळू कोयता गँगचे (Koyata Gang) गुंड सक्रिय होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लोहगाव परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक कोयता गँगचे गुंड आले. त्यांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. आम्ही इथले भाई, आमच्या नादाला लागू नका, असं म्हणत परिसरातील नागरिकांना धमकावले.

इतक्यावरच न थांबता या गुंडांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. चेनाराम चौधरी यांच्या दुकानातही कोयता गँगचे गुंड शिरले. त्यांनी दुकानात तोडफोड करत धुडगूस घातला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT