Mumbai Breaking News : मुंबईच्या विक्रोळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघेजण होरपळले

Vikroli Gas Cylinder Blast : विक्रोळीत स्फोटामुळे घराला मोठी आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत.
Vikroli Gas Cylinder Blast
Vikroli Gas Cylinder BlastSaam TV
Published On

मुंबईच्या विक्रोळी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. विक्रोळी पार्कसाइट परिसरात असलेल्या एका घरात गँस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे घराला मोठी आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Vikroli Gas Cylinder Blast
Belapur Building Collapse : नवी मुंबईतील बेलापुरात इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे असं जखमी व्यक्तींची नावे आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं. आगीत घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या विक्रोळी (Vikroli Gas Cylinder Blast) पार्कसाइट येथील श्रीराम सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे हे आपल्या कुटुंबासहित सोसायटीत राहत होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास जेवण करून ते झोपायला गेले. त्यावेळी किचनमध्ये असलेल्या घरगुती गँस सिलिंडरचा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण सोसायटीला हादरे बसले. स्फोटानंतर फ्लॅटला आग लागल्यामुळे परिसरात मोठा हाहाकार उडाला. कुटुंबासहित इमारतीच्या बाहेर पडत असताना धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिला.

आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Vikroli Gas Cylinder Blast
Pune Dam Water Level : खुशखबर! पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com