Katraj Ghat Shooting News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: कात्रज घाटामध्ये गोळीबाराचा थरार, जखमी व्यक्तीनेच रचला बनाव; धक्कादायक माहिती उघड

Katraj Ghat Shooting News: कात्रज भागात पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना कात्रज घाटामध्ये एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आला होता. या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या कात्रज घाटामध्ये सोमवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली आहे. दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. पण पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबारमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीने कर्जाला वैतागून स्वतःच हा डाव रचला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मंगळवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. कात्रज भागात पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना कात्रज घाटामध्ये एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आला होता. दीपक राजू लकड (वय 42) असे या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

उपचाराकरिता दीपक लकड यांना पोलिसांनी ससून रुग्णालय येथे दाखल केले. पोलिसांनी चौकशी केली असता दीपक लकडने पोलिसांना माहिती दिली की, त्यांना २ व्यक्तींनी कात्रज घाटात नेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास करून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

दीपक लकड यांच्यावर कोणी गोळीबार केला नसल्याचे तपासातून समोर आले. त्यांनी सदरची घटना स्वतःहून घडवून आणली. त्यांच्यावर कर्ज असल्यामुळे कर्जाला कंटाळून त्यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दिपक लकड यांच्या छातीमध्ये गोळी अडकली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला 'साम'वर, 6 विधानसभेसाठी ठाकरे बंधूंचा मास्टरप्लॅन

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

SCROLL FOR NEXT