Pune News
Pune News saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता 24 तास हेल्पलाईन नंबरवर करता येणार पाण्यासंबंधीच्या तक्रारी

Prachee kulkarni

Pune News: तुमच्या परिसरात नियमित पाणी येत नाही? कमी दाबाने पाणी येतेय का? जलवाहिनी फुटली आहे का ? अशा प्रकाराचा पाण्यासंबंधी कुठलाही प्रश्‍न असेल, तर तुम्हाला तो प्रश्‍न थेट महापालिका प्रशासनाला तत्काळ कळविता येणार आहे.

यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागाने 24 तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन सुरु केली आहे. त्यामुळे आता पाण्यासंबंधी तुमच्या अडचणींची सोडवणूक करणे शक्‍य होणार आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जातो. मात्र वेगवेगळ्या भागात पाणी मिळण्यामध्ये अनेकदा अडचणी येतात. त्यामध्ये पाणी नियमीत न मिळणे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, विकास कामांमुळे जलवाहिन्यांची तोडफोड होण्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे पाणी पोहोचण्यात अडथळे येतात.

परिणामी नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त नागरीकांवर अनेकदा थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यापर्यंतची वेळ येते. अशा विविध तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी 24 तास हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

पाणी पुरवठ्यासंदर्भात नागरीकांना तक्रार करण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागाने 020-25501383 हि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी संबंधित क्रमांकावर फोन करुन तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांची समस्या सोडविण्यास पाणी पुरवठा विभागाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT