IAS Pooja Khedkar Saam Digital
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांचे पाय आणखी खोलात, UPSC कडून दिल्लीत गुन्हा दाखल

Case Register In Delhi Against Pooja Khedkar: पुजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाणार आहे.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आयएएस अधिकारी बनण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपीएससीच्या तक्रारीनंतर पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीपोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली पोलिस नोटीस बजावणार आहेत. ⁠यूपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस पाठवली जाणारा आहे. दिल्ली पोलीस नोटीस बजावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नाव बदलून यूपीएससीची परीक्षा देणं, आईचे नाव बदलणे, वडिलांचे नाव आणि सही बदलणे, पत्ता बदलणे अशा पद्धतीने बनावट डॉक्युमेंट सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्या वरतीगुन्हा दाखल करण्यात आला आहे.नोटीस आल्यानंर पूजा खेडकर दिल्ली पोलिसांनी च्या चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी याआधी मसुरी येथील लालबहाद्दुर शास्त्री प्रशासकीय अकादमीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. २३ जुलैपर्यंत पूजा खेडकर यांना मसुरी येथे अकादमीत पोहचण्याचे आदेश देण्यात आले होते. पण पूजा खेडकर तिकडे फिरकल्याच नाहीत. पूजा खेडकर या सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन लागत नाहीये. त्यांना पुणे पोलिसांनी देखील चौकशीसाठी दोन वेळा नोटीस पाठवली होती. पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT