CM Eknath Shinde On Pune Flood Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rainfall: पुणेकरांना पूरातून वाचवा, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Priya More

पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुण्यामध्ये पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुण्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणांतून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याच्या पुरस्थितीकडे विशेष लक्ष आहे. पुणेकरांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि त्यांना अन्न पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला युद्धपातळीवर सतर्क राहण्याचे आदेश दिले. कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीचा आढावा घेत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवीर नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी. त्यांना संपूर्ण मदत, सहकार्य करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजित पवारांनी दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

SCROLL FOR NEXT