Pune Rain Alert : पुणेकरांचं टेन्शन वाढलं! खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, या भागातील वीजपुरवठाही केला खंडीत

Rain Alert : पुणे जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्यातील डेक्कन आणि सिंहगड परिसरातील काही घरांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
Pune Rain Alert
Pune Rain AlertSaam Digital
Published On

पुणे जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे १०० घरांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीत पाणी असलेल्या १५ घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहीत धरून स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे. सर्व जिल्हाधिकार्‍यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकार्‍यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

Pune Rain Alert
IMD Rain Alert : राज्यात पुढचे २ दिवस अतिमुसळधार पाऊस; हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुणेकरांची अक्षरश: दाणादान उडाली. मुळा-मुठा नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. खडकवासला आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग थोडा कमी झाला होता. आता पुन्हा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या घाटमाथ्यावर पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

Pune Rain Alert
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर गेली कुठे! पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com