Waterlogging In Wadachi Wadi Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain News: मान्सूनपूर्व पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, तासभराच्या पावसाने रस्त्यांना नदीचे स्वरूप, पाहा VIDEO

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस (Pre Monsoon Rain) पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली. तासाभराच्या पावसामुळे पुण्याच्या वडाचीवाडी परिसरामध्ये पाणीच पाणी साचले. याठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. या पाण्यामध्ये अनेक वाहनं अडकून पडली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे. पुण्याच्या पावसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळ असणाऱ्या वडाचीवाडी परीसरामध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वडाचीवाडी परिसरामध्ये पाणी साचले. या परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. अवघ्या एका तासाच्या पावसामुळे याठिकाणी रस्त्यावरून जोरदार प्रवाहात पाणी वाहत होते. त्यामुळे यावर्षीदेखील पावसाळ्यात हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

वडाची वाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक फुटापर्यंत पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यात अनेक वाहनं बंद पडली. दुचाकी बंद पडल्याने काही वाहन चालकांना आपली दुचाकी ढकलून बाहेर काढावी लागली. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने कारचालक सावकाश गाडी चालवताना दिसत होते. त्यामुळे पाऊस थांबला तरीही काही काळ येथे वाहतूक संथ झाली होती. त्यामुळे पालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येते.

पुण्यामध्ये आज झालेल्या पावसामुळे हवेमध्ये चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्यामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांचा गोंधळ उडाला. सोबत छत्री किंवा रेनकोट नसल्यामुळे काही पुणेकरांना पावसामध्ये भिजावे लागले. तर काहींनी पाऊस पडत असल्यामुळे झाडं किंवा दुकानाच्या आडोश्याला उभं राहणं पसंत केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT