Pune Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Pune : पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी येथे एका बिल्डिंगमधील चार वर्षांची चिमुरडी खिडकीतून बाहेर उभी राहिली. योगेश कदम यांनी क्षणात धाव घेत चिमुरडीचा जीव वाचवला. ही घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.

Sandeep Chavan

Pune : काळीज पिळवटून टाकणारा आणि धडका भरवणारा हा व्हिडिओ नीट पहा...ही धक्कादायक घटना घडली पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी.. एका बिल्डिंगमधील चार वर्षांच्या चिमुरडीने खिडकीजवळ जात लोखंडी जाळीतून डोके बाहेर काढलं आणि खिडकीजवळच्या सज्ज्यावर ती उभी राहिली..त्याचवेळी लोखंडी खिडकीला पकडून पुन्हा घरात जाण्याचा प्रयत्नही तिनं केले...त्याचवेळी समोर बिल्डिंगमधील एका कुटुंबानं हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये शुट केलं आणि तिचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केला. त्यावेळी योगेश कदम यांनी क्षणात धाव घेत चिमुरडीचा जीव वाचवला. नेमकं काय घडलं ते ऐका...

योगेश चव्हाण हे पुण्याच्या अग्निशामक दलातील कर्मचारी आहेत. साप्ताहिक सुटी असल्यानं ते घरीच होते. "लडकी गिर रही है!” हे वाक्य कानीपडताच ते त्वरीत मुलीला वाचवण्यासाठी 100 मीटर अंतरावरील बिल्डिंगमध्ये गेले. खिडकीतून पडणाऱ्या मुलीचा जीव वाचवला...

भाविकाची आई तिला घरात एकटं ठेवून कुलूप लावून मोठ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. त्याचवेळी ही घटना घडली. मात्र सुदैवानं फायर बिग्रेडच्या या हिरोने भाविकाचा जीव वाचला. योगेश चव्हाण यांच्या कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातयं. मात्र तुम्ही देखील घरात लहान मुलांना एकटं ठेवून जाऊ नका...त्यांना घरात ठेवण्याची वेळ आली तर त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घ्या. कारण तुमचा निष्काळजीपणा दुर्घटनेला कारणीभूत ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

SCROLL FOR NEXT