Ajay Kale  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : लिंगाना किल्ला सर करायला निघालेल्या ट्रेकरला वाटेतच मृत्यूनं गाठलं; पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूचं कारण आलं समोर

Pune News : अजय काळे (वय ६२) यांचा ट्रेकिंगदरम्यान मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : ज्येष्ठ ट्रेकरचा ट्रेक करताना मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. पुणेतील वेल्हे तालुक्याच्या हद्दीस लागुन असलेल्या लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे. अजय काळे (वय ६२) यांचा ट्रेकिंगदरम्यान मृत्यू झाला आहे. (Pune News)

खोल दरीत पडून अजय काळे यांचा मृत्यू झाल्याची अफवा आधी पसरली होती. मात्र शवविच्छेदनानंतर अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

अजय काळे यांना ट्रेकिंगची आवड असल्याने ते विविध ठिकाणी ट्रेकसाठी जात असता. पुण्यातील सह्याद्री ॲड व्हेंचर इन्स्टिटय़ूट या संस्थेतील मित्रांसोबत ते लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकसाठी गेले होते. ट्रेक करत असताना काळे यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

अजय काळे ट्रेक दरम्यान वर्दळीच्या ठिकाणाहून बरंच अंतर पुढे गेले होते. दुर्गम भाग असल्याने त्यांचा मृतदेह बाहेर आणण्याचं मोठं आव्हान समोर होते. दरम्यान एस.एल.अॅडव्हेंचर टीमच्या मदतीने जवळपास ११ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी पहाटे ३ वाजता मृतदेह मोहरी गावात आणण्यात यश आले.

यानंतर वेल्ह्याचे पोलीसांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले. त्यांनतर त्यांचा शवविच्छेदन करण्यात आले, यात त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT