Woman CISF Jawan Bitten By Passenger Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Airport: विमानात प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, वाद सोडवताना महिला जवानाला घेतला चावा; पुणे एअरपोर्टवरील घटना

Woman CISF Jawan Bitten By Passenger: पुणे विमानतळावर विमानामध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी महिला जवान गेली होती. त्यावेळी महिला प्रवाशाने महिला जवानाचा चावा घेतला.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणे एअरपोर्टवर सीआयएसएफच्या महिला जवानाला प्रवाशाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन प्रवाशांमध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी महिला जवान गेली होती. त्यावेळी महिला प्रवाशाने महिला जवानाचा चावा घेतला. सीट मागे घेताना प्रवाशांमध्ये वाद झाला होता. या घटनेनंतर महिला प्रवाशाला एअरपोर्टमधून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पुण्याच्या विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रवाशांमध्ये वाद झाला. एका महिला प्रवाशाने सीटवर दुसरा प्रवासी बसल्याच्या कारणावरून भांडण केले. प्रवाश्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सीआयएसएफच्या महिला जवानाला या महिला प्रवाशाने मारहाण केली. या प्रकरणी सुरेखा सिंग (४४ वर्षे) या महिला प्रवाशाविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला वाकड येखील संतोषनगरमध्ये राहते.

सुरेखा सिंग आपल्या पतीसोबत शनिवारी दिल्लीला जात होती. या महिलेने बुकिंग केलेल्या सीटवर अवंतिका बोरसे आणि आदित्य बोरसे हे प्रवासी बसले होते. यावरून सुरेखा सिंगने बोरसे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू झाल्याने केबिन क्रूने टर्मिनल व्यवस्थापकांना ही बाब सांगितली. त्यावेळी ड्यूटीवर कार्यरत असलेल्या प्रियांका रेड्डी या सीआयएसएफ जवान महिलेला घटनेची माहिती देण्यात आली. त्या घटनास्थळी पोहचल्या.

प्रियांका रेड्डी सहकाऱ्यांसोबत विमानात आल्या असता त्यांना देखील सुरेखा सिंगने लाथाबुक्यांनी मारहाण केली. ऐवढ्यावर न थांबता या महिला प्रवाश्याने तसेच हाताला चावा घेऊन जखमी केले. विमानामध्ये झालेल्या या राड्यामुळे प्रवासी आणि केबिन क्रूमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी महिला जवानाने आरोपी महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात सुरेखा सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेमुळे विमानाच्या उड्डाणाला एक तास उशीर झाला. या घटनेमुळे विमानातील प्रवासीच नाही तर कॅप्टनदेखील घाबरले होते. या घटनेनंतर आरोपी महिला सुरेखा सिंगला विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाने उड्डाण घेतले. पण या एका महिलेमुळे इतर प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. त्यांना एक तास विमानात ताटकळत बसावे लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT