Swargate Police Station  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: कुत्र्याला निर्दयीपणे मारलं, पिता-पुत्रांना पोलिसांनी दाखवला इंगा; पुण्यात नेमकं काय घडलं?

Swargate Police Station : सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाडीचे सीटकव्हर फाडल्याने संतप्त झालेल्या पिता-पुत्रांनी कुत्र्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण करणं पिता-पुत्राला चांगलेच महागात पडलंय. या दोघांविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. प्राणीप्रेमीने या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाडीचे सीटकव्हर फाडल्याने चिडलेल्या पिता-पुत्रांनी कुत्री आणि तिच्या पिल्लांना काठीने बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार एका प्राणीप्रेमीला कळाल्यानंतर त्याने थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल केला. भरतकुमार धनराज गांधी आणि हर्षद भरतकुमार गांधी असे या दोघांची नावं आहेत. ते स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदिनाथ सोसायटीमध्ये राहतात.

कुत्र्यांना मारहाण झाल्याची कळताच प्राणीप्रेमी अ‍ॅड. अमित शहा यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा यांना एकाचा फोन आला. भरतकुमार गांधी हे भटक्या कुत्र्यांना मारत आहेत. शहा यांनी भरतकुमार यांना फोन करुन विचारणा केली. तेव्हा त्यांनी या कुत्र्यांनी सर्व गाड्यांची सीट फाडली. इथं लोकांचे नुकसान होते आहे, असे सांगितले.

फिर्यादी यांनी मी नुकसान भरुन देतो, असे भरतकुमार यांना सांगितले आणि ते इमारतीच्या खाली आले. तेव्हा भरतकुमार गांधी यांच्या हातात काठी होती. ते आणि त्यांचा मुलगा काठीने कुत्र्यांना मारताना त्यांना दिसले. त्यामुळे संतप्त झालेल्या अमित शहा यांनी भरतकुमार गांधी आणि त्यांच्या मुलाविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Reshuffle : अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक', एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी

Gold Rate Today: पहिल्या श्रावण सोमवारी सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा 18 -22 आणि 24 कॅरेटचे दर

Pune : पुण्यात रिलस्टारवर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रिलस्टारसह ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं

जमीन-जुमल्याचे वर्षानुवर्षांचे कोर्ट कचेरीचे वाद मिटणार! राज्य सरकारची मोठी घोषणा, १ सप्टेंबरपासून...

Caffeine and headache: डोकेदुखी झाली की लगेच चहा-कॉफी पिणं खरंच फायदेशीर?

SCROLL FOR NEXT