Bopdev Ghat Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Bopdev Ghat Case: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड

Pune Police: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाचा पोलिस सध्या कसून तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये मोठी अपेडट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने स्वतःचे आणि फरार आरोपीचे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून उघड झाले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख याच्या वडिलांचे नाव जमाल लखपती असे असून त्याने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने फरार साथीदाराचे नाव बाप्या ऊर्फ सोमनाथ यादव असे असल्याचे सांगितले. मात्र त्याचे मूळ नाव बाप्या ऊर्फ सूरज दशरथ गोसावी असे असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणातील आरोपी सध्या येवरडा तुरूंगामध्ये आहेत.

आरोपी पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी, उरुळी देवाची) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींची पोलिस चौकशी करत आहेत. पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींची यापूर्वी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अकोल्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकला

MNS vs Thackeray Group : ठाकरे गटात जाताच अखिल चित्रेंचा राज ठाकरेंवरच हल्लाबोल, VIDEO

MNS - Shinde Group : मनसे - शिंदेसेना संघर्षाचं कारण आलं समोर, एकनाथ शिंदेंनी केला गौप्यस्पोट | VIDEO

Anil Ambani: अनिल अंबानीचं रोजा पॉवर शेअर्सनं बदललं नशीब; फेडलं सारं कर्ज

IPL 2025 New Rule:Ben Stokes आयपीएलचे पुढील २ हंगाम खेळू शकणार नाही! काय आहे BCCI चा नवीन नियम?

SCROLL FOR NEXT