Ajit Pawar Pune Junnar Taluka News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील जुन्नरमध्ये मोठा राडा, अजित पवारांविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी, पाहा VIDEO

Ajit Pawar Pune Junnar Taluka News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत.

Satish Daud

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले असून त्यांच्याविरोधात घोषणबाजी सुरु केली. या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. रविवारी त्यांची यात्रा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आली. यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले.

इतकंच नाही, तर त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील सुरू केली. जुन्नर हा पर्यटन तालुका घोषित झाला असून याबाबतची अजित पवारांकडून बैठक घेतली जाते. मात्र, या बैठकीला महायुतीतल्या घटक पक्षांना विचारात घेतलं जात नाही, असा आरोप भाजपच्या महिला (BJP Women) पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अजित पवार यांच्याकडे पालकत्वाची भूमिका असताना फक्त आमदार अतुल बेनके यांनाच सोबत घेऊन अशा बैठका करणे योग्य नाही. यावर अजित पवारांनी तातडीने माफी मागावी, असं म्हणत महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या. जवळपास 1 तास या पदाधिकारी अजित पवार यांच्याविरोधात घोषणबाजी करत आंदोलन केलं.

दरम्यान, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर अजित पवार गटातील पदाधिकारी देखील आक्रमक झाले होते. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेत आशा बुचके यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT