पुणे: भाजपा आमदार सुनील कांबळे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह मार्केट यार्ड परिसरामधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये काही स्थानिक नागरिकांना दमदाटी करण्याचं प्रयत्न करत आहेत असा आरोप करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) झपाट्याने व्हायरल होत आहेत.
एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाला फायदा पोहोचवण्यासाठी सुनील कांबळे आणि त्यांचे काही सहकारी झोपडपट्टीमध्ये जाऊन झोपडपट्टीतील रहिवाशांना दमदाटी आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप या व्हिडीओद्वारे करण्यात येत आहे.
सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती झोपडपट्टीतील रहिवाशांना मारण्यासाठी हातात लोखंडी हातोडा घेऊन धावताना देखील या व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकारामुळे मार्केट यार्ड परिसरातील आनंदनगर झोपडपट्टी परिसरामध्ये आमदार सुनील कांबळे यांच्या विषयी मोठी दहशत निर्माण झाली आहे.
या प्रकरणात आनंदनगर झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांनी पुण्याचे (Pune) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. स्थानिक मार्केट यार्ड पोलिस स्टेशनमध्ये आमदारांच्या विरोधात तक्रार घेणार नाही, म्हणून नागरिकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.
राज्यात सध्या शिवसेनेचा फुटीरवादी गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदार विरोधात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता कारवाई करणार का? असा प्रश्न देखील या घटनेमुळे निर्माण झाला आहे.
पाहा व्हिडीओ -
यापूर्वी देखील आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करण्याचा कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार सुनील कांबळे यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडियो क्लीप पुन्हा एकदा सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.