Pune News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News : शीतपेय पिताय थोडं थांबा! जुन्रर तालुक्यात घडलेली धक्कादायक घटना वाचा

Cold Drinks : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Sandeep Gawade

Pune News

कडाक्यात उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक शितपेय पिण्याला पसंती देतात. उन्हाळ्यात ठिकठीकाणी असे शितपेय्यांचे स्टॉल थाटलेले पहायला मिळतात. मात्र जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. शितपेय बनवण्यासाठी या बर्फाच्या लादीची विक्री सुरू होती. त्याच बर्फातून अनेक ठिकाणी सरबत,गोळा, गुऱ्हाळावर बर्फ विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ॲन्टॉप हिल गोळीबार प्रकरणामागे कोविडकाळात सोडलेला सराईत गुन्हेगार

ॲन्टॉप हिल परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने विवेक चेट्टीयार या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शनिवारी आकाश कदमवर ॲन्टॉप हिल परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता, त्या प्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस तसेच मुंबई गुन्हे शाखेचं पथक चेट्टीयारच्या मागावर होतं. गुन्हे शाखचेच्या अधिकाऱ्यांना चेट्टीयार डोंबिवलीत लपून बसल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याला सापळा लाऊन अटक करण्यात आली, त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल, सहा जिवंत काडतूस हे आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आली आहे.

दोन वाहतूक पोलिसांना भरधाव कारनं चिरडलं

पिंपरी चिंचवड शहरात भरधाव कारचालकाने बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना चिरडले. या घटनेत दोन्ही वाहतूक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एका पाेलिस कर्मचा-याची प्रकृती गंभीर बनल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आळंदी - दिघी वाहतूक विभागाचे अधिकारी व अंमलदार हे डी.वाय. पाटील कॉलेज जवळ वाहतूक नियमन कारवाई करीत हाेते. यावेळी प्रशांत कदम (वय 20) हा कार भरधाव वेगाने चालवीत असल्याचे आढळले. त्याच्या कारच्या सर्व काचा काळ्या (नियमबाह्य) हाेत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT