Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Bishnoi Gang: बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट, शुभम आणि प्रवीण लोणकर बिश्नोई गँगचे सदस्य; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट

Pravin Lonkar And Shubham Lonkar: अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचण्यात आला होता. याप्रकरणी प्रवीण लोणकर या तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचण्यात आला होता. याप्रकरणी प्रवीण लोणकर या तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बिश्नोई गँगच्या राजस्थानमध्ये भरती कॅम्पला प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम लोणकरने हजेरी लावली होती. ३ महिन्यापासून शुभम लोणकर प्रसार होता. मला शोधू नका असं घरच्यांना सांगून शुभम लोणकर निघून गेला होता. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी शुभम लोणकर याने हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. पुणे पोलिसांकडून बिष्णोई गँगचे कनेक्शन शोधण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रविण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे दोघे सोशल मीडियाद्वारे काही वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले गेले. बिश्नोई गँगला हत्यारे पुरवल्या बद्दल शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर त्यांच्या मुळ गावी होता. तर प्रविण लोणकरने पुण्यातील वारजे भागात डेअरी आणि किराणा विक्रिचे दुकान सुरू केले होते. शुभमच्या सांगण्यावरुन बाबा सिद्दिकींच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे एकामागोमाग हरियाणा आणि उत्तर प्रदेशातुन पुण्यात येऊन राहिले‌.

प्रविण लोणकरने त्याचे दुकान असलेल्या वारजे भागातच एका भंगार विक्रेत्याकडे त्यांना काम मिळवून दिले होते. पुण्यात राहून अनेकदा त्यांचे मुंबईला येणे जाणे सुरू होते आणि सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला जात होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातून त्यांचा मुक्काम मुंबईला हलवला होता. शुभम लोणकरला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आणि शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरुन फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती‌. त्या बातमीचा स्क्रीन शॉट प्रवीण लोणकरने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर त्यावेळी शेअर केला होता.

लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या घडवून आणली होती. त्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव, जुन्नर तालुक्यातील नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश कांबळे यांना अटक केली होती. हे तिघेही लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे प्रभावित होऊन बिश्नोई गँगशी जोडले गेले होते. यावरूनच बिश्नोई गँग महाराष्ट्रामध्ये मोठ्याप्रमाणात सक्रीय असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्र पोलिस सध्या याप्रकरणाचा कसून तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT