iPhone 16 फक्त 35,991 रुपयांमध्ये! MacBook Air M4 पेक्षाही कमी दरात, नेमकं कुठं मिळतोय?

iPhone 16 फक्त 35,991 रुपयांमध्ये मिळत आहे. MacBook Air M4 पेक्षाही कमी दरात आयफोन मिळत आहे.
iPhone 16 news
iPhone 16Saam tv
Published On
Summary

क्रोमाचा सेल 8 मार्च 2026 पर्यंत सुरू

आयफोन 16 (128GB) फक्त ₹35,991 पासून उपलब्ध

मॅकबुक एअर M4 वर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विशेष सवलत मिळतेय

एक्सचेंज बोनस, बँक डिस्काउंट आणि Tata Neu कॉइन्सचा लाभ घेता येईल

Croma Everything Apple Sale: तुम्ही आयफोन किंवा मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. टाटाच्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन क्रोमाने Everything Apple Sale सुरू केला आहे. आयफोन16 पासून मॅकबुक एअर एम4, आयपॅड आणि अॅपल वॉचपर्यंत सर्व वस्तू ऑफर्समध्ये मिळत आहे.

एक्सचेंज, बँक डिस्काउंट आणि Tata Neu बेनिफिट्सनंतर प्रोडक्टच्या किंमत कमी झाली आहे. क्रोमाचा अॅपल सेल सुरू आहे. हा सेल ८ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थी, प्रोफेशनल्स आणि कंटेट क्रिएटर्स सारख्या अॅपल डिव्हाइसवर वेगळेवेगळे डिस्काउंट आणि ऑफर्स देण्यात येत आहे.

iPhone 16 news
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने २० लाखांची खंडणी; व्यावसायिकांमध्ये खळबळ, कारवाईत टोळीचं पुणे कनेक्शन उघड

या सेलमध्ये आयफोन 16 (128GB) हा 35,991 रुपयांपासून सुरू होत आहे. हा आयफोन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर १६,००० रुपयांपर्यत एक्सचेंज वॅल्यू मिळेल. तसेच ६००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जाईल. तसेच तुम्हाला कूपन डिस्काउंट आणि ३,९९९ रुपयांपर्यत Tata Neu कॉइन्सचाही फायदा मिळू शकतो.

iphone news
iphone Saam tv

कमी किंमतीत मिळतोय मॅकबुक

Croma 13 इंच MacBook Air M4 वर खास ऑफर दिली जात आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना हा लॅपटॉप जवळपास ५९,३२० रुपयांना मिळू शकतो. तुमच्या जुन्या डिव्हाइसवर १३००० रुपयांपर्यंत एक्सचेंज, तर १० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळेल. त्याचबरोबर Tata Neu कॉइन्सचाही लाभ मिळेल.

iPhone 16 news
एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? तारीख आली समोर
Q

आयफोन 16 किती किंमतीत मिळतोय?

A

Everything Apple Sale मध्ये iPhone 16 (128GB) फक्त 35,991 रुपयांपासून उपलब्ध आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com