Ajit Pawar Vs Amol Kolhe:  Saamtv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: उमेदवार भेटला नाही की कलाकाराला उभं करतो, कोल्हे त्यापैकीच... शिरुरच्या सभेत अजित दादांचा हल्लाबोल

Ajit Pawar Vs Amol Kolhe: लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करतायेत, ही तात्पुरती आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

रोहिदास गाडगेखेड

Ajit Pawar Shirur Loksabha Visit:

शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारचं असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अमोक कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर आज अजित पवार हे शिरुर लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले अजित पवार?

शिरुर तालुक्यात पुढील काळात राष्ट्रवादीमय वातावरण होईल असा विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी सभेत बोलताना थेट खासदार कोल्हेंवर (Amol Kolhe) निशाणा साधला. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिले. पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, असे अजित पवार म्हणाले.

त्यांना मतदारांचं देणघेणं नसतं..

तसेच "राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन ही निवडून आले अन मग राजीनामा दिला. पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली," असे कोल्हे म्हणाल्याचे सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.

नाटकातून वातावरणनिर्मिती..

"लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करतायेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा, असे म्हणत लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या," असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

SCROLL FOR NEXT