Pune News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News : शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावावर शोककळा

Pune Accident News : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथिल भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रेय वळसे पाटील कृषी फार्म च्या शेततळ्यात बुडवून तिन मुलींचा व एका मुलाचा मृत्यू झाला आहे

Sandeep Gawade

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात तिन मुलींचा व एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. खेळता खेळता ही मुले शेत तळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रद्धा काळू नवले (वय १३), सायली काळू नवले (वय ११), दीपक दत्ता मध्ये(वय- ०७), राधिका नितीन केदारी (वय -14) या चार विद्यार्थ्यांचा झाला शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी सर्व मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे आदिवासी शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुलं शेततळ्या शेजारी खेळत होती. त्यानंतर ही मुले पाण्यात उतरली होती, मात्र त्यांना पोहता येत नव्हतं त्यामुळे ती पाण्यात बुडाली. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना शेततळ्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेचारही मुलांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आले.

चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आई वडील आणि नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. चारही मुलं तळ्याशेजारी हसत खेळत खेळती होती. केवळ मजा म्हणून पाण्यात उतरली आणि घात झाला. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

काळम्मावाडी धरणाजवळ पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथे राहणाऱ्या उज्ज्वल गिरी हा तरुण आपल्या मित्रासोबत राधानगरी तालुक्यात पर्यटनांसाठी आला होता. आज दुपारी तो काळम्मावाडी येथे आला असता काळम्मावाडी धरणाजवळील पाण्यात पाय घसरून पङला. त्याला शोधण्याचा मित्रांनी प्रयत्न केला मात्र तो पाण्यात बुडाल्याने सापडला नाही. ही माहिती राधानगरी पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला देण्यात आली. सायंकाळपर्यंत या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT