Sailors Drowned: सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात ७ खलाशी असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू, काही बेपत्ता

Sailors Drowned In Vengurle Port: वेंगुर्ले बंदरात बोट उलटली. त्यामुळे समुद्रात सात खलाशी बुडाले होते.
 खलाशी बुडाले
Sailors DrownedSaam Tv
Published On

विनायक वंजारे साम टीव्ही, सिंधुदुर्ग

पुणे आणि नगरमध्ये बोट उलटल्याची घटना ताजी असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. २३ मे रोजी रात्री वेंगुर्ले बंदरात बोट उलटल्याची घटना घडली आहे. बोट उलटल्यामुळे सात खलाशी बुडाले होते. त्यापैकी तिन खलाशांनी पाहून किनारा गाठला, त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. यापैकी चार खलाशी बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली. तेव्हा त्यातील दोन खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. तर दोघेजण अजूनही बेपत्ता आहेत.

सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यामुळे काल रात्री या खलाशांची बोट समुद्रामध्ये उलटली आहे. बेपत्ता खलाशांचा शोध अद्यापही जारी (Sailors Drowned In Vengurle Port) आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु इतर दोन खलाशांची अजून काहीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. बेपत्ता खलाश्यांचा शोध घेतला जात आहे.

नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर जिल्ह्यात बोट बुडाल्याची घटना २२ मे रोजी समोर आली होती. SDRF पथकाचे जवान प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी शोधकार्य करत असताना अचानक SDRF पथकाची बोट ( Drowned) अचानक उलटली. या घटनेत तीन जवान नदीत बुडाले. त्यांचा मृत्यू झाला. या बोटीवर असलेला एक स्थानिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.

 खलाशी बुडाले
Young Man Drowns : UPSC ची तयारी करणाऱ्या इंजिनीअर तरुणाचा बुडून मृत्यू, मैत्रिणीच्या कुत्र्याला वाचवायला उतरला होता धरणात

पुण्यातील घटना

पुण्यातील इंदापूर तालुक्यात २१ मे रोजी भीमा नदीत बोट बुडाल्याची घटना (Boat Capsized) घडली होती. नदीतील बोट उलटल्यामुळे ६ प्रवासी पाण्यात बुडाले होते. त्यानंतर बुडालेले प्रवासी आणि बोटीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखलं झालं होतं. एनडीआरएफच्या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली होती. नदीत बुडालेल्या प्रवाशांचा शोध सुरू होता.

 खलाशी बुडाले
Youth Drown in Raigad : धबधब्यावर फिरायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, महाडमधील घावर कुंड येथील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com