राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Raj Thackeray obscene remark Mahesh Mote viral video: राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या रीलस्टार महेश मोटे याच्या तोंडाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून काळे फासून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या रीलस्टारला मनसे पदाधिकाऱ्यांकडून मनसे स्टाईल उत्तर देण्यात आले आहे. रीलस्टार महेश मोटे याच्या तोंडाला काळे फासून त्याला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल महेश मोटे याने सोशल मीडियावरील एका रीलमध्ये अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर विधानसभा उपविभाग अध्यक्ष शुभम जगदाळे यांनी महेश मोटे याला त्यांच्या मनसे संपर्क कार्यालयात बोलावले. यावेळी महेश मोटे याच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि त्याच्याकडून राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागून घेण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com