Pune - Boy Drowns in Swimming Pool Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात मामासोबत पोहायला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू, हडपसर भागातील धक्कादायक घटना

पुण्यात मामासोबत पोहायला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू, हडपसर भागातील धक्कादायक घटना

Satish Kengar

>> अक्षय बडवे

Pune - Boy Drowns in Swimming Pool : पुण्यातील हडपसरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका इयत्ता ९ वी मध्ये शिकत शकता असलेल्या मुलाचा पुण्यात स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा शिंदे (१६) असे तलावात बुडून मुत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हा हडपसर भागात राहायला असून तो जवळ असलेल्या साधना शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिकत होता. साधना शाळेच्या गेटच्या शेजारी एक जलतरण तलाव आहे. कृष्णा हा त्याच्या मामासोबत पोहायला गेला होता.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोहून झाल्यानंतर मामा स्विमिंग पुल मधून आले. दरम्यान, त्यांनी कृष्णा कुठे आहे शोधायला सुरुवात केली. मात्र कृष्णा दिसत नव्हता. कृष्णा हा त्याच्या कपड्यासह पाण्यात बुडाला असल्याचे दिसून येताच स्थानिकांनी त्याला बाहेर काढले. कृष्णाला जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल केले मात्र. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

गुजरातमध्ये ५ अल्पवयीन मुलांचा मृत्यू

गुजरातच्या बोटाद जिल्ह्यात तलावात बुडून ५ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पाचही मुलांचं साधारण वय १६ ते १७ असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

बोटाद शहराजवळील कृष्णा सागर तलावाजवळ दोन मुले त्यांच्या आजोबासोबत फिरायला गेले होते. त्यावेळी लहान मुलांनी आजोबाकडे तलावात जाऊन आंघोळ करण्यासाठी हट्ट केला. त्यानंतर आजोबांनी त्यांना तलावात उतरण्यास परवानगी दिली. त्यानंतर ही दोन मुले तलावात उतरले.

तलावात उतरल्यानंतर ही दोन मुले खोल पाण्यात गेल्याने बुडू लागले. त्यानंतर तलावात आंघोळ करणाऱ्या दुसऱ्या तीन मुले वाचवायला गेले. मात्र, यावेळी अनर्थ घडला. यावेळी तलावात पाच जणांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्तानचाही नेपाळ होणार? भ्रष्टाचार, महागाई अन् अराजकता...जनतेच्या उद्रेकाचा सरकारनं घेतलाय धसका

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा, अपहरण नाट्यावरचा पडदा अखेर उघडला

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउज शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT