Samruddhi Mahamarg Accident : दिवसेंदिवस समृद्धी महामर्गाची ओळख हा 'अपघातांचा महामार्ग' म्हणून निर्माण होत आहे. यामागचं कारणही तसेच आहे. समृद्धी महामार्ग सुरू होऊन दीडशे दिवस झाले आहेत. यातच गेल्या 150 दिवसात या महामर्गावर जवळपास 950 च्यावर अपघात झाले आहेत.
या अपघातात जवळपास 40 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याची गंभीरतेने दखल घेत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी तत्काळ एक तज्ज्ञांंचं पथक या महामार्गावर झालेल्या मोठ्या अपघात स्थळी निरीक्षण करण्यासाठी पाठविलं आहे. (Live Marathi News)
या पथकात तज्ज्ञांंसह, वरिष्ठ परिवहन अधिकारी, वाहतूक पोलिस अधीक्षक सामील झाले होते. या पथकाने अलीकडेच समृद्धी महामर्गाच्या मोठे व जीवित हानी झालेल्या अपघात स्थळांच प्रत्यक्ष अपघातस्थळी जाऊन निरीक्षण केलं.
निरीक्षण पथक आता लवकरच याचा अहवाल एमएसआरडीसीला सादर करून अपघात रोखण्यासाठी अजून नवीन काही उपाय योजना करणार आहे. या पथकात समृद्धी महामार्गाचे वरिष्ठ अभियंता एस.के. सुरवसे यांच्या नेतृत्वात या चमूने समृद्धी महामार्गाच्या अपघात प्रणव स्थळांच निरीक्षण केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.