PUNE NDA saam tv
मुंबई/पुणे

Student Death : सीनियरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील NDA च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ उकललं?

Pune News : एनडीएमध्ये शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. या विद्यार्थ्याने सीनियरकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • एनडीएमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

  • खोलीत गळफास घेत त्याने आयुष्य संपवले

  • सीनियरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय

PUNE NDA : पुण्यातील खडकवासला परिसरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA मध्ये शिकणाऱ्या अवघ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंतरीक्ष कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना दहा तारखेच्या पहाटे घडली असून, या घटनेनं केवळ प्रबोधिनी नव्हे तर संपूर्ण पुणे हादरलं आहे. दुसऱ्या बाजूला, मात्र अंतरीक्षच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या सीनियरकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार केली होती. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी सीनियरकडून होत असल्याच्या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं आहे.

पुण्यातील खडकवासला परिसरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी — NDA मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव अंतरीक्ष कुमार असं असून, वय फक्त १८ वर्षं आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्याचा रहिवासी होता. अंतरीक्षच्या वडिलांचा सुद्धा सैन्यात सेवाकाळ झालेला आहे, त्यामुळे मुलानेही देशसेवेचं स्वप्न पाहिलं होतं मात्र ते अधुरं राहिलं

जुलै महिन्यातच अंतरीक्षने NDA मध्ये प्रवेश घेतला होता आणि सध्या तो पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याला त्याच्या विभागातील सीनियरकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आता केला जातोय. या संदर्भात त्याने आपल्या आईशी फोनवर चर्चा केली होती. इतकंच नव्हे, तर या त्रासाबाबत त्याने NDA मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. त्यावेळी त्याला समजवण्यात आलं आणि पुढे असा प्रकार होणार नाही अशी हमी दिली गेली.

मानसिक ताण सहन न झाल्याने अंतरीक्षने स्वतःच्या खोलीत बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली असा संशय आता निर्माण झालाय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या घटनेमुळे खडकवासला परिसरासह संपूर्ण एनडीए कॅम्पसमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. दुसऱ्या बाजूला, एनडीएकडून या घटनेबाबत दुःख व्यक्त करण्यात आले असून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील ही घटना अत्यंत गंभीर मानली जातेय. या प्रकरणाचा सखोल तपास उत्तमनगर पोलिस करत असून, आत्महत्येचं खरं कारण तपासानंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai Metro: मुंबईकारांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा मेट्रो होणार ६ डब्यांची, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; काय आहे प्लान?

SCROLL FOR NEXT