NCP flags flutter in Pune as Youth Congress President Vishal More is expelled amid election preparations. saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Pune NCP : पुणे महापालिकेच्या निवडणुकांची तयारी चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड झालीय. पुण्याचे राष्ट्रवादी युवक अध्यक्षांची हकालपट्टी करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • ड्रग्स प्रकरणात विशाल मोरे याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

  • विशाल मोरे याला निलंबित करण्यात आले

  • पत्रावर पाच डिसेंबरचा उल्लेख करण्यात आला आहे.

महापालिकेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पक्षांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, त्याचदरम्यान पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष विशाल मोरेची हकालपट्टी करण्यात आलीय.

विशाल मोरेंच्या निलंबनाची पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. विशाल मोरे यांना ५ डिसेंबर रोजीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व ही रद्द करण्यात आले आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणात मोरे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यादिवशी निलंबन करण्यात आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पक्षात बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान अजित पवार गटाने पक्षाच्या प्रतिमेशी कोणत्याच प्रकारची तडजोड करायची नसल्याचं ठरवल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या असल्याने पक्ष श्रेष्ठींनी पक्षातील डागळलेल्या नेत्यांना थेट घराच रस्ता दाखवण्याचं काम सुरू केलंय. माणिकराव कोकाटे हे सदनिका आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा घेत त्यांच्याकडील कातं काढून घेतलं.

गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मोरे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या गोष्टीच दखल घेत पक्षानं शहर अध्यक्षाला निलंबित केलंय. निलंबित पत्रात देखील त्यांनी याचा उल्लेख आहे. गंभीर तक्रारची दखल घेत आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असं पत्रक पक्षाकडून जारी करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: या राशींसाठी आज नवीन ओळखी फायदेशीर ठरतील, जाणून घ्या राशीभविष्य

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

SCROLL FOR NEXT