MLA Dnyaneshwar Katke’s Mercedes Hits 4-Year-Old Girl Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात आमदाराच्या कारने चिमुकलीला उडवले, अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर

Pune–Ahmednagar highway accident involving MLA’s car : पुण्यात आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मर्सिडीज कारने चार वर्षांच्या मुलीला धडक दिल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार न थांबता पुढे गेल्याने स्थानिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Accident CCTV Video : पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने एका चिमुकलीला उडवल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. रविवारी दुपारी दोन वाजताच्या आसपास पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडेमळा परिसरात हा अपघात झाला आहे. ज्ञानेश्वर कटके कारमध्ये होते की नाही? चर्चेला उत आला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा अपघात झालाय. (MLA Dnyaneshwar Katke’s Mercedes Hits 4-Year-Old Girl)

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चार वर्षीय मुलीला उडवल्याची घटना घडली. शिरूरच्या बोऱ्हाडेमळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर (Pune–Ahmednagar highway accident involving MLA’s car) अपघाताचा थरार घडला. या अपघातात ४ वर्षांची शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीला जोरात धडक दिल्यानंतर कार थोडीही जागेवर थांबली नाही. ती भरधाव वेगात घटनास्थळावरून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसतेय.

आमदाराच्या कारने चिमुकलीला धडकल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ४ वर्षांची शुभ्रा रविवारी दुपारी २ वाजताच्या आसपास नाशिककडे जाणारा महामार्ग ओलांडत होती. त्याचवेळी वाघोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी येत असलेल्या आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज (MH 12 1391) कारने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मुलगी चेंडूसारखी उडत काही फुटांवर जाऊन डांबरी रस्त्यावर पडली. मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. दात पडणे, जबड्याला गंभीर दुखापत तसेच चेहऱ्याला खोल जखमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

मुलीला कारने उडवल्याचे समजताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेतले. त्यांनी ४ वर्षाच्या मुलीला तात्काळ शिरूरच्या वात्सल्य रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तिला तातडीने पुण्यातील केएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रुग्णालयाकडून आम्हाला कोणती माहिती मिळालेली नाही. तक्रार देण्यासाठी कोणी आलेले नाही, अशा प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. यामुळे घटना दडपण्याचा प्रयत्न झाला का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जाणार का? असा सवाल केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Jobs: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २७००हून अधिक पदांसाठी भरती

Maharashtra Live News Update: नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Nanded Case: आयुष्यभर सक्षमची बनून राहीन, आरोपींना फाशी द्या; आंचलने सांगितला प्रेमसंबंध ते हत्याकांडाचा घटनाक्रम

Mumbai Air Pollution : दिल्लीनंतर मुंबईचा श्वास गुदमरतोय! BMC कडून २८ मार्गदर्शक तत्त्वे, नियम मोडल्यास होणार कारवाई

मोठी बातमी! FD अन् बचत खात्याच्या व्याजदराबाबत RBI ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला फायदा होणार?

SCROLL FOR NEXT