Pune Navale bridge Series of accidents Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका, दारु ढोसून मर्सिडीज दामटावली, कीर्तनावरुन परताना तरुणाचा जीव गेला

Pune Navle Bridge Accident : पहिला अपघात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता झाला. शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज कार चालवली आणि त्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेला.

Prashant Patil

पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा अपघातांची मालिका पाहायला मिळाली आहे. तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका प्रकरणात महाविद्यालयातील तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि निष्पाप तरुणाचा जीव घेतला. मधल्या काळात अपघातांची मालिका थांबलेल्या नवले पूल परिसर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसतंय.

पहिला अपघात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता झाला. शुभम भोसले या महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज कार चालवली आणि त्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा बळी गेला. शुभम भोसले आणि त्याच्या चौघा मित्रांनी आधी हिंजवडी परिसरात दारु पार्टी केली. त्यानंतर ते पुणे बंगळुरु महामार्गावरुन कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने गेलं.

परतताना वडगाव पुलावर किर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी जाणाऱ्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामधे कुणाल हुशारचा मृत्यू झाला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं तीन वाहनांना धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये दुकाचीस्वार सरळ ट्रकच्या टायरखाली आला. या ट्रकने इतर तीन वाहनांनाही धडक दिली आहे. दरम्यान, तिसऱ्या घटनेत आज शनिवारी सकाळी ७ वाजता अवजड वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT