pune navale bridge accident today Saam TV Marathi news
मुंबई/पुणे

Pune Accident : ८ जणांचा जीव गेला, नवले पूल अपघातात चूक कोणाची? धक्कादायक कारण आलं समोर

pune navale bridge News : पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी. ओव्हरलोड व वेगामुळे कंटेनरने १७ वाहनांना दिली जबर धडक. पोलीस तपास सुरू असून ट्रक मालकावर गुन्हा दाखल. घटनास्थळाचे अपडेट्स येथे वाचा.

Namdeo Kumbhar

  • नवले पुलाजवळ कंटेनरने १७ वाहनांना धडक दिल्याने ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

  • दोन्ही वाहने ओव्हरलोड आणि अतिवेगाने असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • ट्रक ड्रायव्हर, क्लीनर आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल; ड्रायव्हर-क्लीनरचा मृत्यू.

  • या अपघातानंतर PMRDA, PMC, NHAI आणि पोलिसांची तातडीची बैठक बोलावली.

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

pune navale bridge accident today : पुणे बंगळुरू महामार्गावर नवले ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. भरधाव कटेनरने १७ वाहनांना धडक दिली. कंटेनरला भीषण आग लागल्याने ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. १५ ते २० जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर नवले पुलावरील अपघाताच्या सत्राची चर्चा सुरू झाली. पण या अपघाताचं नेमकं कारण काय होतं? याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलेय. दोन्ही गाड्या ओव्हरलोड होत्या आणि त्यांचा वेगही जास्त होता. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे कदम यांनी सांगितेल. (Pune Navale Bridge accident reason overspeeding overloading)

3 जणांविरोधात गुन्हा दाखल -

नवले ब्रिजवर झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी आहेत. ट्रक ड्रायव्हर, क्लीनर आणि मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांचा या भीषण अपघात मृत्यू झाला आहे. ट्रकच्या मालकाचा तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.

अपघाताचे नेमकं कारण काय ? Why Navale Bridge accidents keep happening

अपघात झालेल्या दोन्ही गाड्या ओव्हरलोड होत्या. चालक अतिशय वेगाने गाडी चालवत होता, त्यातच त्याने नियंत्रण सुटल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. कोणतीही परवा न करता चालक भरधाव वेगान गाडी चालवत होता, त्यामुळेच नवले पूलावर अपघात झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे कदम म्हणाले.

या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम झालेले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून मतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात येतील. पोलिसांचा पुढील तपास सुरू असल्याचेही कदम यांनी सांगितले.

तातडीने उपाययोजना करू, मोहोळ यांचे अश्वासन

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाला आज सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले. नवले पुलाच्या परिसरात जे अपघात वारंवार होतात, त्यावरती उपाय करावं म्हणून मागच्या काळात अनेक उपाययोजना तातडीने करण्यात आल्या होत्या. 2022 मध्ये मोठा अपघात या ठिकाणी झाला होता आणि लागलीच काही उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या होत्या. या परिसरात स्पीड गन बसवल्या गेल्या होत्या रंबलर्स टाकले होते, असे मोहोळ म्हणाले.

नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करायच्या आहेत, त्या लवकरच करू. PMRDA,PMC,NHAI आणि पोलीस प्रशासनाची उद्या तातडीची बैठक लावण्यात आली आहे. त्या बैठकीत या सगळ्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करू असेही मोहोळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

Crime News: घरातून उचलून नेत केलं लग्न; नंतर मुलीचा नग्न व्हिडिओ बनवत केला व्हायरल, इन्फ्लूएंसरचं अमानवी कृत्य

SCROLL FOR NEXT