पुणे नाशिक महामार्गावर गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला अटक! 
मुंबई/पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला अटक!

या माहितीनुसार राजगुरुनगर येथील पाबळ चौकात या टोळीतील तीन जण एका वँगनर कारमधुन जात असताना आढळुन आले.

Pravin

पुणे: चाकण औद्योगिक वसाहत आणि पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) वाहने अडवुन गाडीसह, पैसे मुद्देमाल लुटमार करणा-या टोळीला सापळा रचून राजगुरुनगर (Rajgurunagar Police) पोलीसांनी गजाआड केले आहे. पुणे नाशिक महामार्ग, खेड सेझ, शिरुर, चाकण औद्योगीक वसाहत परिसरात रात्रीच्या सुमारास तरुण वयातील हि टोळी लुटमार करत असल्याची गोपणीय महिती राजगुरुनगर पोलीसांना मिळाली.

या माहितीनुसार राजगुरुनगर येथील पाबळ चौकात या टोळीतील तीन जण एका वँगनर कारमधुन जात असताना आढळुन आले. मात्र पोलीसांना पाहून हि टोळी पसार होत असताना टोळीच्या मोरक्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. तर दोन जण पळुन जाण्यात यशस्वी झाले या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल लाड, पोलीस हवालदार सचिन गिलबिले, सचिन जतकर, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे यांनी केली आहे.

पुणे नाशिक महामार्गवरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला चार जणांच्या टोळीने लुटमार करुन मोबाईल व रोख रक्कम लुटली होती. या टोळीच्या मार्गावर राजगुरूनगर पोलीसांनी सापळा रचला, यावेळी चोरी केलेल्या कारमध्ये तीन जण आढळुन आले. मात्र यादरम्यान चलाखीने दोन जण फरार झाले तर कारसह टोळीच्या मोरक्याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून ओंकार गायकवाड असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव असुन अजुन चोरी, दरोड्याचे गुन्हे उघडकीय येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT