पुणे : राज्यात दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) प्रादुर्भाव कमी झाली असला तरी दुसऱ्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्याने राज्याबरोबरच देशाची चिंता वाढली आहे. कोरोनानंतर आता झिका विषाणूने (Zika Virus) लोकांची झोप उडाली आहे. पुणे जिल्ह्याच्या (Pune District) पुरंदर तालुक्यातील बेलसर (Purandar-Belsar) गावामध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे आजुबाजूच्या अनेक गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा प्रसारा रोखण्यासाठी अनेक आरोग्य संस्था गावात जाऊन विविध चाचण्या करत आहेत. झिकाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच उपाययोजनांच्या धरतीवर ग्राम पंचायतीकडून चक्क कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुढचे काही महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे असा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून गावकऱ्यांना देण्यात आला आहे.
त्यामुळे याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले आहे त्यामुळे या गावाची राज्यात जोरदार चर्चा आहे. पुरुषांच्या स्पर्ममध्ये मोठ्या प्रमाणात झिका विषाणू आढळत असल्यामुळे लैंगिक संबंध टाळण्यासाठी हा प्रयत्न केल्या असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ७९ गावांत झिका विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता वर्तवली आहे. या गावांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या ७९ गावांची यादीही जाहीर केली आहे. मागिला काही दिवसांत या गावात डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.