Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरमधून मोठी गळती, आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Pune -Nashik Highway Gas Tanker Leak: पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरमधून मोठी गळती होत आहे. आसपासच्या परिसरामध्ये गॅस पसरला असून घाणेरडा वास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Priya More

Summary -

  • पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ गॅस टँकरमधून मोठी गळती होत आहे.

  • परिसरात गॅस पसरल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून घबराट पसरली आहे.

  • पोलिस आणि प्रशासन गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

पुण्यातील नारायणगावजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याची बातमी समोर आली आहे. टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळीत होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासजवळ ही घटना घडली. गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अचानक गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला. याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासजवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून महामार्गावरच गॅस गळती सुरू झाली. सुरूवातीला कमी प्रमाणात गॅस येत होता पण नंतर मोठ्या प्रमाणातून गॅस गळती होऊ लागली. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक आणि आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गॅस हवेतून सगळीकडे पसरला आहे.

अचानक गँस गळती सुरु झाल्याने आणि घाणेरडा वास येत असल्यामुळे नारायणगाव परिसरात घबरहाटीचे वातावरण आहे. पुणे -नाशिक मार्गावर वाहतूक सुरु असतानाच गँस गळती सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर काहिशाप्रमाणात परिणाम झाला आहे. काही वेळात गँस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गँस गळती सुरु असताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना उपलब्ध नसल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, पुणे–नाशिक जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना घडलेली ही घटना धोकादायक ठरली आहे. यामुळे CNG गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

PM Kisan Yojana: कामाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता; कारण काय?

Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती

मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

SCROLL FOR NEXT