Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

Pune Rain Video: पुण्यामध्ये भयंकर पाऊस पडत आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांचे हाल होत आहे.
Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO
Pune RainSaam Tv
Published On

Summery:

  • पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहे.

  • एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

  • या पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

  • रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्यामुळे पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शहरातील अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला. दिवसभर हवेमध्ये उकाडा जाणवत होता. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. पण अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहे.

पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अगदी तासाभरात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पुण्यातील बाणेरमध्ये असणाऱ्या सकाळनगर परिसरात या पावसामुळे सगळीकडेच पाणी पाणी झाले. याठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे बाणेर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पाण्यातूनच कशी तरी वाट काढत वाहन चालक जात आहेत.

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO
Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाःकार! मुसळधार पावसामुळे विद्यार्थिनीवर कोसळलं भलं मोठ्ठ झाड अन् पुढे...

पुण्यात आज सकाळच्या सत्रात सूर्य देवाचे दर्शन झाल्यानंतर पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह वरुण राजाने हजेरी लावली. पुणे शहरातील विविध परिसरात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळाले. दुपारी ३ वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह पुणे शहरातील पश्चिम भागात दमदार पावसाने बॅटिंग केली. औंध, बाणेर, पाषाण या भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं.

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO
Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर कायम, खडकवासला धरण जून संपण्यापूर्वीच ६३ टक्के भरले, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

बाणेर परिसरातील सकाळनगर औंध रस्ता या परिसरात रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळाले. या पावसामुळे रस्त्यांचं नदीत रूपांतर झाल्यामुळे वाहनचालकांना मात्र याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. संध्याकाळची वेळ असल्यामुळे अनेक नोकरदार, विद्यार्थी हे घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना या रस्त्यांवरून कशी तरी वाट काढत जावे लागले. या पाण्यातून वाट काढताना अनेक दुचाकी देखील बंद पडल्या. बाणेर भागातील सकाळ नगर या परिसरातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणारा रस्ता तर वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे.

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO
Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com