Pune Drug Case Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Drugs Case: ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर, अनधिकृत पब आणि बारवर फिरवला हातोडा; पाहा VIDEO

Pune Municipal Corporation On Action Mode After Pune Drug Case: पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एफसी रोडवर अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर (Pune Drugs Case) पुणे महानगर पालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महानगर पालिकेने (Pune Municipal Corporation) एफसी रोडवरील अनधिकृत पब, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी एफसी रोडवर दाखल झाली असून अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. पालिकेकडून पब आणि बार समोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पुणे महानगर पालिकेकडून ही मोठी कारवाई करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेकडून अनधिकृत पब आणि बारवर धडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात येत आहे. अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे त्यावर कारवाई केली जात आहे. या ठिकाणी असणाऱ्या अनेक हॉटेल, पब आणि बारला नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.

मात्र तरीही अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे त्यामुळे महापालिका आक्रमक होऊन आता कारवाई करत आहेत. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी अधिकाऱ्यांनी हातोडा फिरवण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील L3 पबबाहेर अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचले आहेत. अतिक्रमण विभाग L3 पबवर देखील अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याची शक्यता आहे.

पुण्यातील L3 बारमध्ये कथित ड्रग्सचे सेवन करणाऱ्या २ तरुणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका तरुणाला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. नितीन आणि करण अशी या तरुणांची नावं आहेत. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. दोघे ही तरुण मित्र असून २४ ते २५ वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्री १.३० वाजता या तरुणांनी L3 बारमध्ये एन्ट्री केली होती अशी देखील माहिती सांगितली जात आहे.

पुण्यातील L3 बारमध्ये येण्याआधी ४० ते ५० तरुणांनी हडपसरमध्ये पार्टी केली होती. एफसी रोडवर असलेल्या L3 बारमध्ये येण्यापूर्वी हडपसरमधील एका पबमध्ये त्यांनी पार्टी केली होती. हडपसरमध्ये असलेल्या एका नामांकित पब मध्ये १२ वाजेपर्यंत पार्टी झाली. आणखी पार्टी करण्यासाठी या तरुणांनी L3 बार गाठले होते. हडपसर भागात असलेल्या त्या पबचे सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले आहे. हडपसरमधील पार्टी झाल्यानंतर ५० तरुण L3 मध्ये पोहचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT