Drugs Party In Pune Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Drugs Case : तर्राट! डीजेचा दणदणाट, बेधुंद तरुणाई; पुण्यातील एल ३ हॉटेलच्या पार्टीचे आणखी दोन VIDEO

Drugs Party In Pune Video: रविवारी पुण्यातील लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात आणखी दोन धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

पुण्यातील एफसी रोडवरील पुण्यातल्या लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमध्ये (liquid leisure lounge hotel) ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Pune Drugs Party Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या हॉटेलमधील पार्टीचे आणखी दोन व्हिडीओ समोर आले आहे. डीजेच्या तालावार डान्स, दारुच्या नशेत बेधुंद असलेली तरुणाई या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. रविवारीच लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात आणखी दोन धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमधील समोर आलेल्या दोन व्हिडीओमध्ये तरुणाई पार्टी करताना दिसत आहेत. काही तरुण डीजेच्या तालावर धिंगाणा करतात तर काही दारु पिताना दिसत आहेत. रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये पार्टी सुरू होती. ४० ते ५० जण या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या हॉटेलमध्ये दारुच्या नशेत तरुणाईंचा हा झिंगाट डान्स पुन्हा चर्चेत आला आहे.

पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. हॉटेलचे मालक, डीजे मालकासह ८ जणांना याप्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. संतोष कामठे, सचिन कामठे, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय कामठे, रोहन गायकवाड, दिनेश मानकर या आठ जणांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. न्यायालय त्यांना पोलिस कोठडी सनावणार की न्यायालयीन हे थोड्याच वेळात समजेल.

दरम्यान, याप्रकरणात इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय कामठेने या लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. ४० ते ५० जणांना या हॉटेलमध्ये अक्षय कामठेनेच आणले होते. या हॉटेलमध्ये येण्यावापूर्वी या ५० जणांनी हडपसरमध्ये पार्टी केली होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून लिक्विड लिजर लाउंज हॉटेलचे मुख्य दरवाजा बंद करून पाठीमागच्या दरवाजाने तरुणांना प्रवेश दिला होता. डी जे शो, म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करणे यात अक्षय कामठे हा तरबेज आहे. आत्तापर्यंत पुण्यात झालेल्या अनेक म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन अक्षय कामठेने केलं असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT